शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

कारागीर विद्यापीठ शासनमान्यतेसाठी प्रयत्न - सुरेश हाळवणकर : सिद्धगिरी कारागीर महाकुंभाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 01:31 IST

कोल्हापूर : ‘सिद्धगिरी महासंस्थान’ मधील कारागीर विद्यापीठाला शासनमान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन आमदार सुरेश हाळवणकर यांनी गुरुवारी येथे केले.

ठळक मुद्देकारागिरांचा स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्र देऊन सत्कार

कोल्हापूर : ‘सिद्धगिरी महासंस्थान’ मधील कारागीर विद्यापीठाला शासनमान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन आमदार सुरेश हाळवणकर यांनी गुरुवारी येथे केले. देशाच्या कानाकोपºयांतील विविध कारागिरी, कलांचा समावेश असलेल्या सिद्धगिरी कारागीर महाकुंभाचा भाविक, नागरिकांच्या गर्दीत समारोप झाला.

कणेरी (ता. करवीर) येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानतर्फे हा कारागीर महाकुंभ आयोजित करण्यात आला होता. त्याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. श्री विश्वकर्मा कारागीर नगरीतील या कार्यक्रमास राममंदिर न्यास कमिटीचे अध्यक्ष स्वामी रामविलास वेदांत, राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाचे राष्ट्रीय संघटनमंत्री बसवराज पाटील, बेळगांवच्या मितान फौंडेशनचे गोपीकृष्णन, कोल्हापूर विभागाचे माहिती संचालक सतीश लळीत, प्रमुख उपस्थित होते.

आमदार हाळवणकर म्हणाले, सिद्धगिरी महासंस्थानचे काम भव्य-दिव्य आहे. हजारो वर्षांची कारागीर, कलांच्या जपण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल या कारागीर महाकुंभाच्या माध्यमातून पडले आहे. देशभरातील विश्वकर्मांना एकत्रित करून राबविलेला हा उपक्रम श्रमशक्तीचा महाकुंभ ठरला. सिद्धगिरी कारागीर विद्यापीठाला शासनमान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहीन. शेतकऱ्यांना आत्मविश्वास देण्यासाठी सिद्धगिरीवरील ‘लखपती शेती’चे तंत्रज्ञान देशभरात जाण्याची गरज आहे. त्यासह येथील गुरुकुल शिक्षणपद्धती ही देश बळकट करण्यास उपयुक्त ठरणार आहे. अशा गुरुकुल पद्धतीवरील शाळा शासनाने सुरू कराव्यात.

या कार्यक्रमात महाकुंभातील सहभागी कारागीरांचा प्रमुख उपस्थितांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या कारागीरांना ‘कोल्हापुरी फेटा’ बांधून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, बसंतकुमार सिंग, योगीप्रभू, रामबाबू, सुरेश पाटील, नाना पठारे, हिंदुराव शेळके, प्रताप कोंडेकर, आर. डी. शिंदे, डॉ. संदीप पाटील, आदी उपस्थित होते.महाकुंभाला आठ लाख लोकांची भेटया महाकुंभात देशाच्या कानाकोपऱ्यांतील १२० कारागीर सहभागी झाले. त्यांच्या माध्यमातून पाचशे कला, कारागिरीचे दर्शन घडले. दोनशेहून अधिक गायी, बैलजोड्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. महाकुंभाला पाच दिवसांत सुमारे आठ लाख लोकांनी भेट दिली. शंभर साधू-संत सिद्धगिरी मठावर आले. दरवर्षी कारागीर महाकुंभ भरविण्याचा विचार सिद्धगिरी महासंस्थान करत असल्याचे अमित हुक्केरीकर यांनी यावेळी सांगितले.शेतकºयांना ‘पॉलीहाऊस’द्वारे मदतीचा हातसेंद्रिय भाजीपाला उत्पादनातून रोजगार निर्मितीसाठी श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानतर्फे मदतीचा हात दिला जात आहे. शेतकऱ्यांना चौदा पॉलीहाऊस बांधून दिले जाणार आहेत. त्यासाठी शेतकºयांची स्वत: जमीन आणि पाणी, विजेची उपलब्धता असणे आवश्यक आहे.

या पॉलीहाऊसमध्ये उत्पादित होणारा सेंद्रिय भाजीपाल्याला बाजारपेठदेखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. ज्या शेतकºयांना पॉलीहाऊस बांधून दिले आहे. त्यांनी पॉलीहाऊस बांधणीतील निम्मा खर्च परत करावयाचा आहे. शेतकऱ्यांकडून परत येणाऱ्या पैशांतून अन्य शेतकऱ्यांना पॉलीहाऊस बांधून देण्यासाठी मदत केली जाणार आहे.च्त्यातील पहिल्या पॉलीहाऊसची किल्ली कणेरी (ता. करवीर) येथील मनीषा पाटील यांना आमदार सुरेश हाळवणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. सिद्धगिरी हॉस्पिटल येथे लवकरच कार्डियॉक सेंटर सुरू केले जाणार आहे.